कळंब /प्रतिनिधी   - 

पाथर्डीच्या जिल्हा परिषद शाळेत दरवर्षी प्रमाणे इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी आज स्वयंशासन दिनी शाळेत कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांना अध्यापन केले.सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेला राष्ट्रपुरुषांचे सात फोटो सप्रेम भेट केले.स्वयंशासन दिनात मुख्याध्यापक म्हणून श्रेयश देशमुख तर उपमुख्याध्यापक म्हणून प्रिती धेले या विद्यार्थ्यांनी काम पाहिले.सुपरवायझर म्हणून पृथ्वीराज सावंत तर शिक्षक म्हणून ओंकार पिंगळे, गणेश मुजमुले, गोविंद जाधव, सुजित सावंत यांनी काम पाहिले.

स्वयंशासन दिनानिमित्त पाथर्डी गावचे तरूण उद्योजक संजय चिंचकर यांनी अंबिका इलेक्ट्रॉनिक्स, कळंब च्या वतीने विद्यार्थ्यांना भाषण करण्यासाठी अतिशय सुंदर डायस आणि स्टुल भेट केला. शाळेच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पुरी भाजी, मसाला भात,जिलेबी असे यथेच्छ जेवण दिले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत पिंगळे, माजी सरपंच अर्जून जाधव, अण्णासाहेब धेले इ.उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, शिक्षक राजेंद्र पवार शिक्षिका आशा पवार, मनिषा पवार ,सुरेखा भावले यांनी परिश्रम घेतले.


 
Top