धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव येथे राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार   राणाजगजितसिंह पाटील यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अामदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या महाअधीवेशनास केलेल्या सहकार्याबद्दल व महाराष्ट्र शासनाने गुरव समाजाचे संत श्री काशीबा महाराज गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून यासाठी 50 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केल्या बद्दल नुतन प्रदेशाध्यक्ष   बाळासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते  आ. राणा जगजीतसिंह पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

याचवेळी  आ. राणा जगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते नुतन प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब क्षिरसागर यांचाही सत्कार करण्यात आला. यासाठी धाराशिवचे नगरसेवक  युवराज नळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच धाराशिव येथील गुरव समाजाचे संत श्री काशीबा महाराज चौकात गुरव समाज बांधवांच्या वतीने श्री काशीबा महाराजांच्या प्रतीमेस अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे सक्रिय सदस्य  त्रिंबक सिंदफळकर यांच्या सेवानिवृत्तीनिमीत्त प्रदेशाध्यक्ष श्री बाळासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब क्षिरसागर, धाराशिव जिल्हाध्यक्ष  भालचंद्रराव धारूरकर, नगरसेवक युवराज नळे,  अंबादासराव औटे,  महेश मोटे,  मोहन औटे,   राजू गुरव,  आनंद औटे,  महेश गुरव, सुनील तिर्थकर,   रवी तिर्थकर, प्रदीप मोकाशे,   समाधान बेद्रे, वैभव फुलारी, मोहीत सिंदफळकर, दिनेश इनामदार, अजय सिंदफळकर,  बचाटे, भागवत मुळजे, श्री बनजगोळे,  विजय पाटील व धाराशिव जिल्ह्यातील अनेक गुरव समाज बांधव उपस्थित होते.

 

 
Top