तेर / प्रतिनिधी-

 धाराशिव तालुक्यातील तेर येथील तेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वयंम शिक्षण प्रयोग धाराशिव व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली.

शालेय व्यवस्थापन समितीने करावयाची विविध कामे याबाबत चित्रफीत दाखविण्यात आली.यावेळी तेरणा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब वाघ, मुख्याध्यापक संतोष गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, बालाजी भोरे, नरहरी बडवे उपस्थित होते.  प्रास्ताविक स्वयंम शिक्षण प्रयोगच्या संवादक राणी शिराळ यांनी केले तर आभार नवनाथ पांचाळ यांनी मानले.यावेळी नंदकुमार खोत, बिभीषण देटे,प्रा.दयानंद फंड, अच्युत हाजगुडे, शिवाजी सूर्यवंशी, सूर्यकांत जाधव, सुधाकर चव्हाण,  टाटाचे समन्वयक विशाल कांबळे, रागीणी बालगुडे,अयान शैख,दत्ता सोनवणे ,स्वयंम शिक्षण प्रयोगच्या संवादक पुजा निकम,सिमा सरडे,आलका कावळे,साधना पढवळ,गिता तिवारी उपस्थित होते.


 
Top