कळंब/ प्रतिनिधी-

धाराशिव जिल्हा बालकल्याण समिती सदस्य यांनी कळंब येथील ज्ञानेश्वर बालग्रह  येथे दिनांक 25 मार्च रोजी भेट दिली व  समिती सदस्य अॅड, सुजाता माळी यांचा वाढदिवस  अनाथ बालकांमध्ये मुली सोबत  साजरा केला.

यावेळी अॅड. विजयकुमार माने, अध्यक्ष बालकल्याण समिती हे होते तर प्रमुख उपस्थिती बाल कल्याण समिती सदस्य अॅड,.सुजाता माळी ,अॅड दिपाली जाहगीरदार अॅड. मैना भोसले ,पत्रकार व समिती सदस्य दयानंद काळोखे, ऑपरेटर कुलकर्णी  संत ज्ञानेश्वर माऊली बालगृह कळंब चे संचालक ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष ह .भ. प .महादेव महाराज अडसूळ संचालिका सरस्वती अडसूळ , सुनिता शिंदे , माधवसिंग राजपूत, संदीप कोकाटे ,राजकुमार अडसूळ,  बंडू ताटे यांची उपस्थिती होती .


 
Top