धाराशिव / प्रतिनिधी-

 धाराशिव तालुक्यातील तेर येथे बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी  एसटी बस आणि टेम्पो मधील डिझेल चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

     एम एच -20-बी एल 16 36  सोलापूर- तेर  हि कळंब आगाराची  बस  तेर बसस्थानकात मुक्कामी  थांबून  परत सकाळी सहा वाजता सोलापूरला मार्गस्थ होणार होती. चालक धनंजय बीटे व वाहक प्रशांत जाधव रात्री जेवण करून कंट्रोल रूममध्ये झोपले होते. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन  डिझेल टाकीचे लॉक तोडून  बसमधील 140 लिटर डिझेल चोरले तर  टेम्पो क्रमांक एम एच -04-Fj -1242 ही गाडी तेर येथील पेठ भागात घरासमोर लावलेली असताना डिझेल टाकीचे  टोपण उचकून 50 लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची धक्कादायक घटना घडली  आहे.बस चालक धनंजय बीटे व विकास भोरे यांच्या तक्रारीवरून ढोकी पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तेर दुरक्षेत्रचे बीट अंमलदार प्रदीप मुरुळीकर  करत आहेत.


 
Top