धाराशिव
: मराठा सत्तेचा राज्यविस्तार करणारे स्वराज्याचे विस्ताराक सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती धाराशिव शहरांमध्ये अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे यांच्या नेतृत्वाखाली   उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चौकामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला हार घालून व मल्हार होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी भारत अप्पा डोलारे,  दत्ता अप्पा बंडगर, डाॅ. गोविंद कोकाटे, राजाभाऊ वैद्य, दत्ता चौरे, मुकुंद घुले, संभाजी सलगर, प्रा.मनोज डोलारे, प्रा.बालाजी काकडे, प्रा.सोमनाथ लांडगे,आकाश ढेकणे,समाधान ढेकणे, बाबासाहेब ढेकणे, मनोहर ढेकणे, इंद्रजित देवकते, श्रीकांत तेरकर,  बालाजी वगरे बालाजी तेरकर, शाम तेरकर, संतोष वतने, गणेश एडके उपस्थित होते.
 ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून व चौकातील सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेला हार घालून ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व माँसाहेब जिजाऊ चौकातून महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून व हार घालून धाराशिव शहरांमध्ये नव्याने करण्यात आलेल्या स्वराज्य विस्तारक सुभेदार मल्हारराव होळकर चौकामध्ये थांबली. ही रॅली  चौकात आल्यानंतर फटाक्याची आतिशबाजीत रॅलीचे स्वागत करण्यात आले. या चौकामध्ये भव्य स्टेज व मंडपामध्ये मान्यवरांचे स्वागत करण्यात आला सुरुवातीला चौकामध्ये उभारण्यात आलेल्या ध्वज स्तंभाचे व ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याच कार्यक्रमांमध्ये शिवजयंती निमित्त माँसाहेब पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या वंशातील भूषणसिंह राजे होळकर यांना शिव रॅलीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान दिल्याबद्दल शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष सुर्यवंशी धर्मराज, कार्याध्यक्ष गौरव बागल, रवी मुंडे, संतोष घोरपडे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर इतिहासाचे जाणकार व पुरणतत्त्व विभागाचे अभ्यासक श्री जयराज खोचरे यांनी यावेळी मल्हार होळकरांच्या कार्यकर्तुत्वाचे गुणगान आपल्या व्याख्यानातून अतिशय छानपणे मांडले. तत्कालीन राज्य व्यवस्था, शेतकऱ्यांसाठी असलेली व्यवस्था, पाणी व्यवस्था या सर्व गोष्टीची आपल्या व्याख्यानातून मांडणी केली.
जयराज खोचरे यांच्या व्याख्यानानंतर युवा व्याख्याते व होळकर शाहीचे अभ्यासक महेश पिंगळे त्यांनी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने व प्रसंगानुरूप सुभेदार मल्हारराव होळकर, खंडेराव होळकर व पुण्यश्लोक माँसाहेब अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना समाज शिक्षित, संघटित, व स्वावलंबी झाला पाहिजे असे प्रा. मनोज डोलारे यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ लांडगे तर आभार अरविंद ढेकणे यांनी केले.
 याच जयंतीच्या कार्यक्रमात चौकाचे सुशोभीकरण करून ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आल्यानंतर बसण्यासाठी बेंचची व्यवस्था करण्यात आली व परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत ढेकणे, हनुमंत ढेकणे, अच्युत ढेकणे, पद्माकर ढेकणे, समाधान ढेकणे, विकास ढेकणे, योगेश ढेकणे, रोहन ढेकणे, जगदीश ढेकणे, बंटी भैय्या ढेकणे, अरविंद ढेकणे, रोहन ढेकणे, गुरूराज ढेकणे, आकाश ढेकणे, महेश ढेकणे यांनी प्रयत्न केले.

 
Top