धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव शहराजवळ असलेल्या शेरकर वाडगा, देवळाली, सांजा शिवारातून विद्युत पंपासह शेतीसाहित्याची चोरी करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी गजाआड केले आहेत. त्यांना शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, शेरकरवाडगा, येथील भाऊसाहेब जालींदर शेरकर व सतिश शेरकर यांच्या धाराशिव शिवारातील शेरकर वाडगा शेत गट नं 289 व 286 मधून रेणगन व 500 फुट केबल चोरट्यांनी लंपास केले होते. सांजा, येथील अमोल सुरेश सुर्यवंशी यांचे उस्मानाबाद शिवारातील शेरकर वाडगा येथील तळ्यामधील विद्युत पंप चोरुन नेला होता. तसेच देवळाली, येथील नारायण नामदेव सुर्यवंशी यांचे देवळाली व शेकापूर शिवारातील 34 स्पिंक्लर चिमण्या चोरुन नेल्या. या प्रकरणी शहर पोलीस ठाणे व ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते.

गुन्हे तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन सचिन भैरु ईटकर व किरण विनायक जाधव वय 25 वर्षे हे शेकापूर शिवारातील एका शेतात राहत असून त्यांनी मागील काही दिवसापुर्र्वी शेतकी साहित्य चोरी केलेले आहे. अशी बातमी मिळालेवरुन पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडे अधिक चौकशी केली असता त्यांनी शेरकर वाडगा व शेकापुर परिसरातील शेतामधून एक विद्युत पंप, स्पिंक्लर व रेणगन चोरलेले आहे. अशी कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीचे साहित्य जप्त करून त्यांना शहर ठाण्याच्या ताब्यात दिले.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थागुशा च्या पोनि यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री. ओहाळ, पोलीस हावलदार- सय्यद, पठाण, सावंत, जाधवर, पोलीस अंमलदार- आशमोड, यांच्या पथकाने केली आहे.

 
Top