परंडा / प्रतिनिधी-

 शासन निर्णय 2015 नुसार दिव्यांग यांना पाच टक्के निधीचे वितरण दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या निवेदनानुसार मार्च अखेर परंडा नगरपालिकेने दिव्यांग निधीचे मंगळवार दि.28 रोजी वितरण केले. हा वितरण सोहळा येथील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे सभागृह परंडा येथे पार पडला. 

यामध्ये परंडा नगरपालिकेने 146 दिव्यांग बांधवांना 5% निधीचे ई प्रणाली द्वारे वाटप केले एकूण रक्कम 9 लाख रुपये आरटीजीएस द्वारे दिव्यांगाच्या खात्यात वर्ग करण्यात आली अशी माहिती परांडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी  सौ.मनीषा वडीपल्ली  यांनी दिली यावेळी वडेपल्ली  यांनी दिव्यांग  यांनी बचत गट स्थापन करावा अशी माहिती दिली व दिव्यांगांनी बचत गट स्थापन करून स्वावलंबी बनावे दिव्यांगाने दिव्यांगांचा उद्धार करावा व वेळोवेळी लागणाऱ्या मदतीची गरज करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत तसेच स्वच्छताचे महत्त्व देखील यावेळी  कार्यक्रमांमध्ये माहिती दिली व विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये परंडा नगर परिषदेचे कर्मचारी महेश एकशिंगे , किरण शिंदे , अमोल अंगरके , रणजित काशीद ,जलाल मुजावर , कसबे सोमनाथ आदी कर्मचारी, अधिकारी वर्ग उपस्थित होते.तसेच यावेळी दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके, शहराध्यक्ष गोरख देशमाने , महिला अध्यक्ष शैला पोतदार , भारत झोंबाडे आदी दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.निधी वाटपामुळे उपस्थित दिव्यांगा मध्ये आनंद व्यक्त करण्यात आला.

 
Top