धाराशीव/ प्रतिनिधी 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अझहर चांद मुजावर व जमीर शेख यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी दि.८ मार्च रोजी आमरण उपोषण सुरू केले असून आजचा पहिला दिवस आहे.

 उस्मानाबाद जिल्हा ऐतिहासिक जिल्हा असून या जिल्ह्याचे नाव धाराशिव ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक होते. मात्र हरकती न मागविता न्यायालयीन प्रकरण असताना केवळ सत्तेच्या बळावर नामांतर केले आहे. त्यामुळे या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दि.६ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. तर नुकतीच केंद्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर व उस्मानाबादचे धाराशिव नामांतरासाठी मंजुरी दिली आहे. मात्र या नामांतराबाबत नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे होतेच. शिवाय त्यांच्या हरकती व मते जाणून घेणे आवश्यक होते. परंतू तसे न करता नागरीकांना विश्वासात न घेता व न्यायालयीन प्रकरण चालु असताना केवळ सत्ता हाती असल्यामुळे या नामांतरास मंजुरी दिल्यानंतर नागरीकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. या नामांतराच्या मंजुरीस नागरिक म्हणून विरोध दर्शवित आहोत. त्यामुळे उस्मानाबादच्या नामांतरास नागरिकांचा विरोध असून नामांतर करण्यात येवू नये या मागणीसाठी  दि.८ मार्च रोजी आमरण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण अनेकजणांचा सहभाग पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे वरीष्ठांना कळवून आमच्या मागणीचा विचार करुन सहकार्य करावे अशी मागणी केली आहे.

 
Top