धाराशीव/ प्रतिनिधी 
बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे, त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत आणि त्यांच्याकडून देश सेवा घडावी आणि त्यांनी जबाबदार नागरिक म्हणून पुढे यावे. हा शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा मुख्य उद्देश होता. असे प्रतिपादन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्रा.डॉ.शिवाजीराव देशमुख यांनी केले. 
 येथील  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले होते. आज दि. 8 मार्च 2023 रोजी या व्याख्यानमालेचे  पहिले पुष्प गुंफण्यासाठी तुळजाभवानी महाविद्यालयातील प्रा. डॉ.शिवाजीराव देशमुख हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले होते.तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे होते. प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, बापूजींनी समाजासाठी त्यागातून काम केले  आहे. सध्याच्या काळात बापूजींच्या विचारांचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडणे काळाची गरज आहे.   सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा डॉ शिवाजीराव गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन अरविंद हंगरगेकर यांनी केले.तर आभार प्रा.राजा जगताप यांनी मानले.
    सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   प्रस्तुत कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
 
Top