सोलापूर / प्रतिनिधी-

सोलापूर विभागात 100% विद्युतीकरणासह 2023-24  मध्ये सोलापूर विभागातील 100% विद्युतीकरणामुळे वार्षिक 122  कोटी रुपयांची बचत होणार आहे. 

भारतीय रेल्वे, जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहे. वर्ष  2023 पूर्वी “नेट झिरो कार्बन एमिटर” बनण्याच्या दिशेने भारतीय रेल्वे वाटचाल करीत आहे. रेल्वेला पर्यावरणपूरक, कार्यक्षम, किफायतशीर, वक्तशीर   आणि नवीन भारताच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रवाशांचे आधुनिक वाहक तसेच मालवाहतूकदार होण्याच्या सर्वांगीण दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले जाते.

  सोलापूर रेल्वे विभाग हा भारतीय रेल्वेवरील मध्य रेल्वेच्या पाच रेल्वे विभागांपैकी एक आहे.  हा विभाग सामरिकदृष्ट्या मुंबई - चेन्नई, मुंबई - बेंगळुरू आणि मुंबई - हैदराबाद मार्गाच्या मुख्य मार्गावर स्थित आहे.  कर्नाटक एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, हुसेन सागर एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस आणि सिद्धेश्वर एक्सप्रेस ह्या या विभागातून जाणाऱ्या प्रमुख प्रतिष्ठित गाड्या आहेत.  सोलापूर विभाग हा 140 वर्षांहून अधिक जुना आहे आणि जीआयपी रेल्वेचा एक भाग म्हणून रायचूर ते पुणे/मनमाड अशी यावरील मुख्य मार्गिका होती.  क्षेत्रीय रेल्वेच्या निर्मितीनंतरक्ष 1966 ते 1977  दरम्यान हा दक्षिण-मध्य रेल्वेचा एक भाग बनले, यातून काही मार्ग काढून टाकले आणि नंतर मध्य रेल्वेवर परत आल्यानंतर काही भाग पुन्हा यात मिळाला.

या विभागामध्ये 976 रूट किमी (RKM) आणि 1,792 ट्रॅक किमी (TKM) ब्रॉडगेज मार्ग आहे.  विभागाची एकूण स्थापित ट्रॅक्शन वीज पुरवठा क्षमता 604 MVA आहे ज्यामध्ये 11 ट्रॅक्शन सब स्टेशन समाविष्ट आहेत.  अंकाई - दौंड, मिरज - कुर्डूवाडी, दौंड - सोलापूर - वाडी आणि कुर्डूवाडी - लातूर विभागातील रेल्वे विद्युतीकरण 2014-23 मध्ये पूर्ण झाले.  औसा रोड - लातूर रोड दरम्यान सुमारे 50  रूट किमी (RKM) च्या अंतिम पॅचचे विद्युतीकरण करून विभागाचे 100% विद्युतीकरण साध्य झाले.

या विभागात 100% विद्युतीकरण साध्य करून, रेल्वेने वाहतुकीचा पर्यावरणपूरक मार्ग सुनिश्चित केला गेला आहे. त्यामुळे आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होऊन राष्ट्राच्या मौल्यवान परकीय चलनाची बचत झाली आहे.  याशिवाय, ट्रॅक्शन बदलांमुळे अडथळा टळून विभागीय क्षमता देखील वाढली आहे.

 तसेच 100% विद्युतीकरणामुळे,  वार्षिक इंधन बिलात सुमारे रु. 122 कोटी कपात झालेली आहे.  त्यासोबतच  चालू आर्थिक वर्षात सुमारे 57114.67 टन कार्बन उत्सर्जन कमी झाला आहे.


 
Top