वाशी  / प्रतिनिधी-

प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी उत्सव आहे . या उत्सवाशी शहरातील नागरीकासह समस्त हिंदू समाजाच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत .

 यामुळे गुरुवारी  दिनांक ३०/०३/२०२३ रोजी असलेल्या रामनवमीनिमित्त शहरातील मांस ,मच्छी विक्रीचे दुकाने व तालुक्यातील भरत असलेल्या आठवडी बाजारातील मांस ,मच्छी ची दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी वर्तक चौक मित्र मंडळाने निवेदना द्वारे केली आहे . सदर निवेदनावर नगर सेवक बळवंतराव कवडे ,निलेश मोळवणे ,अभिषेक बोराडे ,रोहित मोळवणे ,अक्षय कवडे ,प्रशांत कवडे ,विशाल महामुनी यांच्यासह ४६ जणांच्या सह्या आहेत .


 
Top