जळकोट  / प्रतिनिधी-

   तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील आदर्श महिला प्रभाग संघाची सन 2022 - 23 ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात व येत्या वर्षात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत राबविला जाणाऱ्या विविध  विकास योजना वैयक्तिक व सामुदायिक पातळीवर राबवून आर्थिक सक्षम होण्याचा संकल्प करून दिनांक 26 मार्च 2023 रोजी येथील केदारलिंगेश्वर मंदिरातील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

 प्रारंभी संघाची प्रार्थना गायन करण्यात आली. उमेदचे सारंग पारडे, संतोष सोनवणे, विवेकानंद पवार, दत्तात्रय शेरखाने, ओमकार दीक्षित, नामदेव तांबटकरी, गणेश कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सहचिटणीस महेश कदम, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका कदम, प्रभाग संघाच्या अध्यक्षा शिरीन इनामदार, सचिवा सुरेखा कुंभार, कोषाध्यक्षा शशिकला कदम आदी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारंग पारडे हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना नामदेव तांबटकर यांनी सादर केली तर वार्षिक अहवाल वाचन प्रभाग संघाच्या अध्यक्षा शिरीन इनामदार यांनी केले. उपस्थित महिला सदस्यांना उमेदचे सारंग पारडे, संतोष सोनवणे, विवेकानंद पवार, नामदेव तांबटकर आदींनी उमेदच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. सदर योजनांच्या माध्यमातून महिलांनी  कुटुंबाची आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन यावेळी  अधिकाऱ्यांनी केले. उपसरपंच प्रशांत नवगिरे, राष्ट्रवादीचे महेश कदम, पत्रकार संजय रेणुके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रभाग संघासाठी सभागृह करण्यासाठी जागेची मागणी केल्याने उपसरपंचांनी सरपंचांशी विचारविनिमय करून जागा देण्याचे आश्वासन यावेळी दिले. इतकेच नव्हे तर भविष्यात ग्रामपंचायतकडून आवश्यक ते सहकार्य देण्याचे वचनही यावेळी संबंधितांना उपसरपंचांनी दिले. यावेळी ठाकरे सेनेचे येडोळा येथील शाखाप्रमुख राजेंद्र जाधव, वागदरी येथील पत्रकार किशोर धुमाळ आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.                          

उपस्थित मान्यवरांचा शाल, फेटा, पुष्पगुच्छ देऊन प्रभाग संघातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रभाग संघांतर्गत येणाऱ्या जळकोटसह, जळकोटवाडी, मानमोडी, होर्टी, चिकुंद्रा, बोरमन तांडा, रामतीर्थ तांडा, येडोळा, वागदरी आणि हगलूर येथील एकूण 257 गटातील जवळपास 300 महिला सदस्य उपस्थित होत्या. सदर सभा यशस्वी करण्यासाठी प्रभाग संघाच्या अध्यक्षा शिरीन इनामदार, सचिवा सुरेखा कुंभार, कोषाध्यक्षा शशिकला कदम, सी.आर.पी. नौशाद तांबोळी, सबिया जमादार, तेजा लोखंडे, गंगुबाई लोखंडे,  केशर जाधवर, लक्ष्मीबाई जाधव, विद्या बिराजदार आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमकार दीक्षित यांनी केले तर आभार सबिया जमादार यांनी मानले.

 
Top