धाराशिव / प्रतिनिधी-

 सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अक्षेपार्य बदनामीकारक मजकूर टाकल्या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांना शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने लेखी निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला आहे. 

 धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यातील बेंबळी येथील एक नराधम  रेहान बरुडे याने सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अक्षेपार्य बदनामीकारक मजकूर टाकला आहे. यामुळे तमाम शिवभक्त शिवप्रेमी भारतवासीयांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. या बुद्धीभ्रष्ट व्यक्तीमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. समाजात प्रचंड मोठा आक्रोश निर्माण झालेला आहे.या  व्यक्तीस तात्काळ अटक करून त्यास महाराष्ट्र बाहेर तडीपार करण्यात यावे अन्यथा शिवराज्याभिषेक सोहळा समिती, धाराशिवच्यावतीने त्या नराधमाचे विरुद्ध आणि पोलीस प्रशासना तसेच शासना विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन   जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षक   धाराशिव यांना देण्यात आले आहे. 

  याप्रसंगी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे धाराशिव अध्यक्ष धर्मराज सूर्यवंशी शुभम लोकरे,  कृष्णा साळुंखे, संतोष घोरपडे, रमेश यादव, पवन राऊत,  दत्ता साळुंखे,  महेश बागल, तुषाल सूर्यवंशी,  राजभाऊ ढोबळे,  चंद्रकांत पांढरे,  ईश्वर काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top