धाराशिव / प्रतिनिधी-

जिल्हयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा तर्फे राज्यात एक लाख उद्योजक निर्माण करण्याचे उिद्दष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये जिल्हयातील खासगी बँका सहकार्य करत आहेत. तर राष्ट्रीयकृत बँका मात्र सहकार्य करत नाहीत, अशी खंत आण्णासाहेब पाटील आिर्थक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. 

बुधवार दि. २९ मार्च रोजी नरेंद्र पाटील धाराशिव येथे आले होते.  यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र पाटील यांनी जिल्हयात आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बँक कर्ज मंजुरीचे लाभार्थी  २ हजार ७४१ आहेत. जिल्हयात एकुण बँकेने वितरीत केलेले कर्ज मंजूर रक्कम १८० कोटी ११ लाख आहे. तर जिल्हयातील लाभार्थ्यांना आजपर्यंत व्याज परताव्यापोटी १८ कोटी ४  लाख रुपये देण्यात आले आहेत. महामंडळाकडून २३७० व्याज परतावा सुरू केलेले लाभार्थी आहेत. 

खासगी बँका आघाडीवर 

२०२४ पर्यंत राज्यात एक लाख मराठी उद्योजक निर्माण करण्याचे उद्दीष्ट आहे. धाराशिव जिल्हयातील परिस्थिती पाहता खासगी बँकांनी चांगल्या प्रकारे सहाकार्य केले आहे. परंतू ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत. या बँकांनी मात्र शाखा भरपूर असताना ही सहकार्य केले नाही, असे सांगून नरेंद्र पाटील यांनी याबाबत आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ही सांगितले. विशेष म्हणजे कर्ज वाटप केलेल्या पैकी एक ही उद्योजक थकबाकीत नाही, असे ही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या काळात आरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभा करण्याकडे दुर्लक्ष झाले. या स्मारकासाठी निर्माण केलेल्या कार्यालयात केर कचरा साचला होता. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या आर्थसंकल्पात महामंडळासाठी ३०० कोटी रुपये राखीव करण्यात आले आहेत, असेही पाटील यांनी सांगितले. 

गिरीष बपाट यांची आठवण

गिरीष बापट यांचे पुण्यात निधन झाले. अन्न नागरी पुरवठा मंत्री असताना बापट यांनी अनेक चांगल्या योजना आखून ग्रामीण भागापर्यंत लवकर-लवकर अन्नधान्य कशा पध्दतीने पोहचेल हे पाहीले. विरोधकांना सुध्दा बापट मान-सन्मानाने वागवत होते, असे सांगून बापट यांना नरेंद्र पाटील व नितीन काळे यांनी पत्रकार परिषदेपुर्वी श्रध्दांजली वाहीली.

 
Top