धाराशिव / प्रतिनिधी -

देशातील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदार की रद्द केली. सरकारच्या विरोधात बोलल्यानंतर त्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते, त्यामुळे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत असल्याची दिसत आहे, असे मत
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड. धीरज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

राहुल गांधी यांची खासदार की रद्द केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने सोलापूर-धुळे महामार्गांवर रस्ता रोको करण्यात आला. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांची शिवसेना सहभागी झाले होते. माध्यमाशी बोलताना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राहुल गांधी यांच्यावर लादलेला हा अन्यायकारक निर्णय असून तमाम जनता रस्त्यावर उतरली आहे. तर शिवसेनेचे माजी न.प. गटनेते सोमनाथ गुरव यांनी भाजपवर टिका करत ईडी, सीबीआय, चौकशी विरोधकाच्या मागे लावली जाते. त्यामुळे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे होत आहे, असा आरोप केला. 

यावेळी राजेंद्र शेरखाने, सक्षणा सलगर, डा. िस्मता शाहापूरक, उमेश राजेनिंबाळकर, ज्योती सपाटे, शिला उंबरे, प्रा. संजय कांबळे, अिग्नवेश शिंदे, प्रशांत पाटील, एड. जावेद काझी,पाडुरंग कुंभार, जावेद काझी, प्रशांत पाटील, भागवत धस, मसोद्दीक काझी, रणवीर इंगळे, सिध्दार्थ बनसोडे, शेखर घोडके आदी सह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. 

 
Top