धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव-तुळजापूर रोडवर कावलदरा येथील हायवे रोडवर एका अज्ञात वाहनाने रस्ता क्रॉस करताना एका अनोळखी महिलेस धडक दिल्याने ती महिला मयत झाली आहे. महिलेच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाल्याने तिची ओळख पटत नाही. ओळख पटविण्यासाठी तिच्या दोन पायांचे तुकड्यांसह मासाचे तुकडे सरकारी दवाखाना येथे प्रिझर्व्ह करुन ठेवले आहेत.

  मयत महिलेचे अंदाजित वय 55 ते 60 वर्ष आहे. अपघात झाला त्या ठिकाणी एक चॉकलेटी-गुलाबी रंगाची लेडीज चप्पल त्यावर पिवळ्या कलरची डिझाईन असलेला एक जोड, रुपयांची नाणी, एक निळसर रंगाची काळपट झालेली साडी आढळून आली आहे. अशा वर्णनाच्या अज्ञात मयत महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन उस्मानाबाद पोलिस स्टेशन (ग्रा.) यांनी केले आहे.


 
Top