धाराशिव / प्रतिनिधी -

धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सलग दुसऱ्या दिवशी लाचखोर विरोधात मोठी कारवाई केली आहे. परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथील पोलीस पाटील यांना 70 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. वाळू संदर्भात ही लाच घेतली आहे.पोलीस पाटील हरिदास हावळे यांना लाच घेताना अटक केली आहे.

तक्रारदार यांना मौजे ढगपिंपरी गावच्या हद्दीतील चांदणी नदी पात्रातील वाळू उत्खनन  करण्याचा लिलाव मिळाला होता. सदर वाळू घाटावर पाहणीसाठी ग्राम दक्षता समिती नेमन्यात आली होती. सदर समितीचे सदस्य हरिदास लिंबाजी हावळे, पोलीस पाटील,  ढगपिंपरी , ता. परांडा, (ईतर लोकसेवक ) हे असून त्यांनी यातील तक्रारदार यांना तुम्ही नियमबाह्य वाळू उत्खनन करताय, त्याचे फोटो काढून महसूल विभागाला पाठवतो आणि तक्रार करतो असे सांगून फोटो काढून महसूल विभागाला तक्रार न करण्यासाठी पंचांसमक्ष यापूर्वी दोन लाख रुपये लाच रक्कम मागितल्याचे मान्य करून 9 मार्च रोजी 70 हजार रुपये लाचेची मागणी करून दिनांक 24 मार्च रोजी 70 हजार रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याने आरोपी यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन परांडा  येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. 

सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांनी कारवाई केली. सापळा पथकात पोलीस अमलदार  विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांनी कारवाई केली.

 
Top