नळदुर्ग / प्रतिनिधी-

 कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करावी या प्रमुख मागणीबरोबरच इतर मागण्यांसाठी दि.१४ मार्च पासुन राज्यांतील कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. नळदुर्ग नगरपाकेतील  ३० कर्मचारीही बेमुदत संपावर गेले आहेत. संपावर गेलेले कर्मचारी नगरपालिकेसमोर ठाण मांडुन बसले आहेत.

         राज्यांतील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी दि.१४ मार्चपासुन राज्यांतील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात नळदुर्ग नगरपालिकेतील ३० कर्मचारी सहभागी झाले आहेत. नगरपालिकेतील जे कर्मचारी संपावर गेले आहेत ते पुढीलप्रमाणे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक कांबळे, उपाध्यक्ष मुनिर शेख, सचिव अजय काकडे, संघटनेचे जिल्हा सदस्य के. एस. शेख, सतीश आखाडे,मुकुंद भुमकर, फुलचंद सुरवसे, भीमसेन भोसले, मुश्ताक पटेल, समीर शेख,अमित गायकवाड, आनंद खारवे, यशवंत पारधे, शैलेश बनसोडे,संजय कांबळे, वाल्मिक खारवे, भारत पारधे, विकास कांबळे, लक्ष्मी देडे, शितल काळे, मंदाकिनी सोनवणे, शांताबाई देडे, आर. आर. रोमन, सत्यजीत कदम, किशोर बनसोडे,चंद्रकांत जाधव, तानाजी गायकवाड, खंडप्पा शिंदे, व्ही. बी. खंदारे व एच. के. काळे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 
Top