तुळजापूर / प्रतिनिधी- 

 संभाजीनगर व धाराशिव नामांतराला विरोध करणाऱ्या व संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे फोटो कार्यक्रमात लावून त्याचे उदातीकरण करणाऱ्या शिवद्रोही खा. इम्तियाज जलील याच्या विरोधात मंगळवार  दि.१४ मार्च रोजी  संभाजी ब्रिगेडच्या वतीने तिर्थक्षेञ तुळजापूरात भव्य  विद्रोह मोर्चा काढण्यात आला .

मंगळवार दि.१५रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती रथात ठेवून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. मोर्चात जय भवानी जय जिजाऊ छञपती शिवाजी महाराज कि जय  यासह अनेक घोषषांनी संभाजी ब्रिग्रेड छाव्याने शहर दणाणुन सोडले होते. शहराच्या प्रमुखमार्गावरुन हा विद्रोह मोर्चा तहसिल कार्यालय येथे आल्यानंतर येथे संभाजीब्रिग्रेड जिल्हाध्यक्ष शरद पवार जीवनराजे इंगळे महेश गवळी किरण घाडगे वाडदेकर  किशोर गंगणे सुनिल गंगणे कुमार टोले अर्जून सांळुके सुनिल नागणे  यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.

तहसिल कार्यालयासमोर  शिवद्रोही महाराष्ट्र द्रोही खा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणा देवुन त्याचा छायाचित्रे असलेल्या फलकास जोडे मारण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मार्गदर्शन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन  तहसिलदार सौदागर तांदळे  यांनी स्विकारले.

 
Top