धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन रविवार दि.२६ मार्च २०२३ रोजी श्री हनुमान मंदिर, काक्रंबा, ता.तुळजापूर येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात काक्रंबा व परिसरातील सर्व वयोगटातील ६२५  महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन  सरपंच कालीदास खताळ, याच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे उपसरपंच छायाबाई वट्टे, मंदिराचे विश्वस्त गौतम सोनटक्के, ग्रा.प. सदस्य विकास भिसे, सोमनाथ भोगरे, पवन वाघमारे, ॲङ पदमाकर गडदे, शिवाजी सुरवसे, पदमराज गडदे, आण्णा हांडे, शशिकांत पाडागळे, तुकाराम मोरे, संपत सोनटक्के, एस.एस.घोगरे इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.‍ अजित निळे, डॉ विजय राऊत, डॉ. तेजस राणे, डॉ. प्रतिक राठोड, डॉ.रिया तिवारी, डॉ.नंम्रता गर्जे, डॉ.व्यकटेश पाटील यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हळ, अमिन सय्यद, पवन वाघमारे,  निशिकांत लोकरे, सचिन व्हटकर, रवी शिंदे, व काक्रंबा केंद्राच्या आशा कार्यकर्ता छाया स्वामी, वनमाला गायकवाड, सारीका बचाटे, कौशल्या गाडेकर व अनंत कुलकर्णी यांनी परीश्रम घेतले.


 
Top