धाराशिव / प्रतिनिधी-
शिवसेनेच्या ठाकरे गटाला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला असुन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गौतम लटके यांनी आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिंदे गटात प्रवेश केला.
ठाकरे गटाला गळती लागली असुन अनेक सरपंच, उपसरपंच यानंतर आता जिल्हाप्रमुख लटके यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पुणे येथे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या कार्यालयात लटके यांनी पक्ष कार्यकर्तेसह शिवसेनेत प्रवेश केला.पालकमंत्री डॉ सावंत यांच्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवत त्यांनी प्रवेश केल्याचे सांगितले. भुम परंडा मतदार संघात सध्या अनेक विकास कामे होत असुन विकासाच्या मुद्यावर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. लटके यांना मानणारा एक मोठा गत मतदार संघात आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे ठाकरे गटात एकटे पडणार आहेत.