धाराशिव-तुळजापूर/ प्रतिनिधी-

जनेतला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली आहे. निवडणुका आल्या की जातीयवाद पेरणार्‍या भाजपाला आता त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघ आणि कसबा पोटनिवडणुकीतील निकालामुळे भारतीय जनता पार्टीला राज्यात बुरे दिन सुरू झाल्याचे दिसत आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा.शरदचंद्र पवार यांचे विचार कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवावेत. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केले.

 राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील 27 महानगरे आणि 328 तालुक्यांमध्ये शरद युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली गुरुवारी (दि.2) धाराशिव येथे आली असता शिवगौरी फंक्शन हॉलमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर,  प्रशांत बाबर, सुरेश पाटील, डॉ.प्रतापसिंह पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, माजी नगरसेवक बाबा मुजावर, नितीन बागल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी बोलताना महेबूब शेख यांनी म्हणाले की, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात न्याय मिळतो. हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून पक्षश्रेष्ठींनी सिद्ध केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता आपण युवकांचे संघटन वाढविणार असल्याचेही ते म्हणाले. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारवर त्यांनी कडाडून टिका केली. आमदारकी वाचविण्यासाठी खा.शरद पवार यांची साथ सोडून गेल्यानंतर काय होतास तू काय झालास तू अशा शब्दांत त्यांनी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरही निशाणा साधला. उपस्थित मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरदचंद्र पवार फाऊंडेशनचे अध्यक्ष शेखर घोडके यांनी केले. युवा संवाद यात्रेचे धाराशिव शहरात आगमन झाल्यानंतर शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यांतर शहरातून भव्य रॅली काढणयात आली. मेळाव्यास प्रशांत कवडे, अरुण आसबे, प्रशांत कवडे, मजहर शेरीकर, शंतनु खंदारे, नागनाथ पाटील, शहराध्यक्ष आयाज शेख, पृथ्वीराज आंधळे, अफसरा पठाण, मिनील काकडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असदखान पठाण, जिल्हा उपाध्यक्ष कुणाल निंबाळकर, महादेव माळी, तालुका कार्याध्यक्ष नाना जमदाडे, शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, विधिज्ञ विभागाचे शहराध्यक्ष अ‍ॅड.योगेश सोन्ने पाटील,  माजी नगरसेवक इस्माईल शेख, पृथ्वीराज चिलवंत, रणवीर इंगळे, प्रशांत वीर, नारायण तुरूप, अनिकेत पाटील, मृत्युंजय बनसोडे, विवेक साळवे, अविनाश जाधव, अमोल सुरवसे, पंकज भोसले, ज्योति माळाळे, अजयकुमार कोळी, पृथ्वीराज मुळे, सौरभ देशमुख, विवेक साळवे, सरफराज कुरेशी, अतुल आदमाने, कुणाल कर्णावर, प्रतिक माने, सुरज वडवले यांच्यासह शहर व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 धाराशिव, तुळजापूर येथील मेळाव्याच्या नियोजनाचे कौतुक

शरद युवा संवाद यात्रेच्या धाराशिव आणि तुळजापूर येथील मेळाव्याच्या नियोजनाची जबाबदारी शरदचंद्र पवार युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शेखर घोडके व पृथ्वीराजआंधळे यांच्यावर सोपविण्यात आली होती. धाराशिव येथील मेळाव्याबरोबर तुळजापूर येथेही युवा संवाद यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल घोडके यांचे महेबूब शेख यांनी कौतुक केले.


 
Top