तुळजापूर / प्रतिनिधी-

पोलिस स्टेशन लगत, अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मोबाईल दुकानात २८ लाखाची चोरी झाली. ही चोरीची घटना तुळजापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील साळुंके कॉम्प्लेक्समध्ये 19 मार्चच्या रात्री घडली. मोबाईल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. जवळपास २८ लाख किमंतीचे विविध किंमतीचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन शिंदे यांचे तुळजापूर शहरातील साळुंके कॉम्पलेक्स येथे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. हे दुकान बसस्थानक परिसरात धाराशिव रोडला आहे. १९ मार्च रोजी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकाटून दुकानामध्ये प्रवेश केला. दुकानातील विविध कंपनीचे 28 लाख रूपये किंमतीचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. सोमवारी दि. २० मार्च रोजी सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर सचिन शिंदे यांनी घटनेची माहिती तुळजापूर पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.

या बाबत फिर्याद दादा शिंदे यांनी दिली. दुकानात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही मध्ये फोरव्हिलर आल्याचे दिसत आहे. त्यातील काही युवक गाडीच्या खाली उतरून दुकानाचे शटर कटावणीने उचकटन आत प्रवेश करताना दिसत आहेत. अशी माहिती मोबाईल दुकानचे मालक सचिन शिंदे यांनी दिली. परिसरातील सीसी टीव्हीच्या माध्यमातून पोलिसांचा तपास सुरू आहे.


 
Top