तुळजापूर/ प्रतिनिधी-

शहरातील नळदुर्ग रोडवरील गोलाई चौकात शुक्रवार   दि.२४रोजी सांयकाळी साडेसात वाजता सुमारास ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळुन आला . सदरील मयताची अद्याप ओळख पटली नसुन तो भाविक असल्याची शक्यता  आहे. 

  नळदूर्ग गोलाई चौक रोड बाजूस तुळजापूरला जाणा-या रस्त्याचे कडेला एका ६० वर्षीय मृतदेह   पोकाँ कुंभार यांना दिसून आला.सदरील अज्ञात मयताचा अंगावर पांढरा शर्ट, काळी पँट असुन रंग गोरा आहे. अशा वर्णणाचा इसम कुणाच्या ओळखीचा  असल्यास त्यांना तुळजापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बीट अमलदार विजय राठोड यांनी केले आहे. सदरील घटनेची  नोंद अकस्मात मुत्यु म्हणून करण्यात आली आहे.


 
Top