तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील सर्व शेतकरी सभासद यांना आवाहन करण्यात येत की, नाफेड मार्फत  जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या आदेशाने कार्यक्षेत्रातील हरभरा उत्पादक सभासद शेतकरी यांचा हरभरा (चना) खरेदी विक्री संघ, तुळजापूर मार्फत खरेदी केला जाणार असून, या साठी खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी दि. 27/12/2023 पासून सुरु करण्यात आलेली आहे तरी सर्व सभासद शेतकरी यांनी हरबरा नोंद ७/१२, पीक पेरा, ८ अ, आधार कार्ड व बँक पासबूक या आवश्यक कागदपत्रासह, नोंदणी साठी तुळजापूर तालूका शेतकी सह खरेदी विक्री संघ कार्यालय (कृषी उत्पन्न बाजार समिती) येथे ऑनलाईन नोंदणी साठी प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन तुळजापूर तालुका खरेदी विक्री संघ   चेअरमन सुधीर कदम, व्हा चेअरमन संजय धुरगुडे  यांनी केले आहे. 

 
Top