धाराशिव/ प्रतिनिधी-

 शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या इमारतीत जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धाराशिव आणि श्रीपतराव भोसले धाराशिव  हायस्कूल अंतर्गत गुरुवर्य के.टी. फाऊंडेशन वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान व सक्षमीकरण शिबीर दि.२८ मार्च २०२३ रोजी संपन्न झाले .  

उद्घाटक शिक्षणाधिकारी  मा.जि.प गजानन सुसर , अध्यक्ष राज्य शासन पुरस्कार सन्मानित प्राचार्य तथा मुख्याध्यापक भोसले हायस्कूल साहेबराव देशमुख निमंत्रक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य दयानंद जटनुरे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आदित्य सुधीर पाटील प्रमुख उपस्थिती प्राध्यापक सिपेट सीएसटीसी छ.संभाजीनगर श्रीपाद कुलकर्णी , मॅनेजर सिपेट सीएसटीसी छ.संभाजीनगर मिलींदकुमार धरणे  यांच्या मार्गदर्शात संपन्न झाले. या विज्ञान जत्रेत आनंद मेळावा , गुरुवर्य के.टी.पाटील फांऊडेशन वर्गाच्या विधार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रयोगाचे प्रदर्शन तसेच चित्रांचे चित्रदालन यामध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे मातीची खेळणी या चे हि प्रदर्शन लावले होते या शिबीरात जिल्ह्यातील शिक्षक विद्यार्थ्यांसमवेत बहुसंख्येने उपस्थित होते डायएटच्या अर्चना नलावडे ' सुनीता भोसले यांनी सर्व शिबीराची पाहणी केली. 

यशस्वीतेसाठी गुरुवर्य के.टी. पाटील फाऊंडेशन प्रमुख डॉ. विनोद आंबेवाडीकर, अध्यापन करणारे शिक्षक सत्य प्रकाश , चंदनकुमार , विशाल कुमार , मृदुल त्रिवेदी, कलाध्यापक शेषनाथ वाघ पर्यवेक्षक वृंद, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिक्षम घेतले व समारोप सत्रात प्रमाण पत्र वाटप करण्यात आले.

 
Top