धाराशिव / प्रतिनिधी-

डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल गडपाटी धाराशिव येथील आर.पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये डॉ. प्रतापसिंह  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला धाराशिव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रसिद्ध विधीज्ञ  वैशाली देशमुख,के. टी. पाटील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय धाराशिव येथील डॉ.अरुणादेवी बिराजदार,आरोग्य अधिकारी, आयुष्य रुग्णालय धाराशिव,डॉ. महिविश मोमीन,  अध्यापक  महाविद्यालय गडपाटी येथील   प्रा. सुकेशनी मातने-गव्हाणे,  श्रीमती.वनिता नाईकवाडी,खो.खो.पट्टू कु. निकिता पवार यांची उपस्थिती लाभली.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी देशाच्या जडणघडणीतील स्त्रियांचे योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर विधीज्ञ  वैशाली देशमुख यांनी महिला वरील वाढते अन्याय अत्याचार रोखण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन ते रोखण्यासाठी आपण सर्वांनी पर्यंत करावेत असे आवाहन केले. तसेच त्यांनी स्त्रियांचे हक्क याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.बिराजदार यांनी फार्मसी क्षेत्रातील महिलांचे योगदान व त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. सहाय्यक प्राध्यापिका, शिक्षण महाविद्यालय गडपाटी येथील सुकेशनी मातने गव्हाणेयांनी स्त्री - पुरुष समानता व महिला सबलीकरण ही काळजी गरज आहे. तसेच त्यांनी विद्यार्थिनीनी त्यानुसार आपण आपली वाटचाल करावी असे आवाहन करण्यात आले. तसेच डॉ.  महिविश मोमीन यांनी विद्यार्थिनींचे आरोग्याचे प्रश्न व त्याविषयी घ्यावयाची काळजी याविषयी विस्तृतपणे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे समन्वयक  म्हणून प्रा.शिवानी डोके व प्रा.अबोली ठाकूर यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी कु. ऋतुजा मगर व सुप्रिया सुरवसे तर आभार प्रदर्शन  प्रा. सिध्दी बसाटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 
Top