उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवनावर आधारित शंभूराजे या महानाट्याचे उद्घाटन मोठ्या थाटात मान्यवरांच्या उपस्थितीत दि.११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आले. 


या धगधगत्या महानाट्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विश्वास शिंदे, मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत, शिवसेना (बाळासाहेब) चे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, सह संपर्कप्रमुख अनिल खोचरे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, संजय मुंडे, कॉंग्रेसचे राजाभाऊ शेरखाने, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे संचालक आशिष मोदाणी, युवराज राजेनिंबाळकर, सिद्धार्थ बनसोडे, दत्तात्रय भालेकर, योगेश जाधव, सनी पवार, राजाभाऊ पवार, अमर माळी, राजेश बंडगर, आदित्य शिंदे, आकाश सर्जे, संभाजी फरताडे, प्रवीण कांबळे, अथर्व निंबाळकर, राजकिरण सोनवणे, अक्षय बागल, किशोर साळुंके, प्रकाश घायाळ, सौरभ गायकवाड, अभिजीत देडे, विकास पवार, राजेश बंडगर, राकेश सुर्यवंशी, वैभव मुंडे, आदित्य शिंदे, सौरभ गायकवाड, दिलीप चौधरी, सुधाकर पवार, विक्रम राऊत, गजानन खर्चे, भारत कोकाटे, जयंत पाटील, संजय पाटील, राजीव पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, अर्चनाताई ओंबासे, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत व राधिका राऊत यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या महानाट्य पाहण्यासाठी महिला व पुरुष यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top