उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालातीमध्ये प्रलंबित, किरकोळ न्यायालयीन प्रकरणाच्या तडजोडीकरून प्रकरणे निकाली काढण्यासाठी येणाऱ्या विधीज्ञ व पक्षकारांसाठी रुपामाता उद्योग समूहातर्फे अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला. 

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे  ादव साहेब,  अग्रवाल साहेब,  मोहिते साहेब,  गुप्ता साहेब, रुपामाता अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सत्यनारायण बोधले, विधी अधिकारी विधीज्ञ सौ. विद्युलता दलभंजन, विधीज्ञ सौ.वैशाली देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा विधीज्ञ श्री. व्यंकटराव गुंड (पाडोळीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी   सागर खोत,  भास्कर तडवळकर,  पवन जमाले,   महेश जाधव,   अरुण पवार,  विकास जाधव,  हर्षद शिंदे यांनी परिश्रम घेतले.


 
Top