उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आयुब अजीजखान  पठाण यांची उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री तथा जेष्ठ नेते मधुकरराव चव्हण यांनी नूतन अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आयुब पठाण यांचा सत्कार करून करुन पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना, दिलेली जबाबदारी व काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणानुसार संघटन मजबूत करण्याचे काम करीन, असे पठाण यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष खलील सय्यद, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेबुबपाशा पटेल, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड जावेद काझी, रशीद कोतवाल व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top