उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पेतून राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण चळवळीच्या मदतीला आर्ट ऑफ लिव्हिंग धावून आली आहे. जिल्हा पोलीस दल व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यात वृक्षारोपण  सेद्रिंय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रंम हाती घेण्यात येणार आहे.तुळजापूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रंमात जिल्हा पोलीस अधीक्षक हे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणत वृक्षारोपण करुन सर्व घटकांमध्ये वृक्षचळवळी बाबत जनजागृती करत असल्याबद्दल श्रीश्री रविशंकर यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कार्याचे कौतुक केले.

 तुळजापूर येथे गुरुवार दि.02.02.2023 रोजी आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने श्रीश्री रविशंकर यांच्या उपस्थ्तिीत जागर कार्यक्रंमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रंमात जिल्ह्यात वृक्षारोपणाच्या माध्यमातून हरितक्रांतीची चळवळ गतिमान केल्याबद्दल श्रीश्री रविशंकर यांच्या हास्ते शाल, पुष्पगुच्छ देउन उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर यापुढे जिल्ह्यात वृक्षारोपण आणि सेंद्रिेय व नैसर्गिक शेतीला प्रोत्सान देण्यासाठी जिल्हा पोलीस दल आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सोबतीने काम करतील अशी ग्वाही श्रीश्री रविशंकर यांनी दिली.

 उस्मानाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी  यांनी पदभार स्विकारल्या पासून जिल्हा पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व 18  पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि वृक्षप्रेमीच्या सहभगातून वृक्षारोपण चळवळ गतिमान केली आहे. तीर्थक्षेत्र येरमाळा येथील श्री. येडेश्वरी देवी मंदीराचा डोगंर परिसर, तसेच भुम तालुक्यातील हाडोंग्री येथील डोगंर भागात विविध देशी प्रजातीची झाडे, फळ व फूलझाडांची लागवड  अतुल कुलकर्णी  पुढाकार घेउन केली आहे. तसेच पोलीस मुख्यालयाच्या परिसरात देखील नागरिकांसाठी मियावाकी उद्यानाची निर्मिती करुन जनतेचा  सहभाग या चळवळी मध्ये वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम ते करीत आहेत. या कामात जिल्हा पोलीस दलातील अधिकारी,अंमलदार,स्वंयसेवी संस्था, संघटना तसेच  वृक्षप्रेमींचा सहभागही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.


 
Top