उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

तुळजाभवानी जिल्हा क्रिडा संकुल उस्मानाबाद येथे उस्मानाबाद जिल्हयाचा श्री तुळजाभवानी जिल्हा कृषि महोत्सव दि.10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे.

 या महोत्सवात सर्व शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.सदर कृषि महोत्सव सुव्यवस्थित पार पाडणेसाठी प्रत्येक विभागाने यामध्ये सक्रीय सहभाग घेणे गरजेचे  आहे. या कृषि प्रदर्शनामध्ये शासनाचे विविध विभागांचे स्टॉल उभारावयाचे आहेत. या स्टॉलमध्ये आपल्या विभागांच्या योजनांची शेतकऱ्यांना परिपूर्ण माहिती प्रात्यक्षिकाव्दारे (live sample/demonstration) देता येईल तसेच भेट देणाऱ्या शेतकरी यांना आपल्या विभागाचा जास्ती जास्त प्रत्यक्ष लाभ देता येईल.यांचे नियोजन करावे व तसेच भेट देणाऱ्या शेतकऱ्यांमधून आपल्या विभागाच्या योजनांची गरज असलेले लाभार्थी यांच्या नोदी ठेवाव्या जेणे करून भविष्यात त्यांना संपर्क करून लाभ देणे सोईचे होईल. व कृषि महोत्सव आयोजनाचा साध्य होईल. किंवा (6X6 फुट) सदर कृषि महोत्समध्ये शासकीय विभागांसाठी स्टॉलचे आकारमान 10 बाय 10 (10X 10) आकाराचे असून त्यामध्ये एक टेबल व दोन खुर्ची पुरविण्यात येईल.वरील प्रमाणे पाच दिवसांचे आपल्या विभागाचा स्टॉल उभारणाऱ्या व स्टॉल वरती उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक याचे नियोजन करून प्रकल्प संचालक  आत्मा उस्मानाबाद यांना कळवावे. स्टॉल उभारणीबाबत आत्मा कार्यालयाचे कर्मचारी श्री. अमोल पांचाळ,संगणक अज्ञावली रुपरेषक ,मोबाईल नं.9420036335 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.


 
Top