धाराशिव / प्रतिनिधी-

धाराशिव तालुक्यातील  बेंबळी येथील जिल्हा परिषद प्रशालेतील  सन १९८४-८५ यावर्षी दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व वर्ग मित्रांनी एकत्र येऊन स्नेह मेळावा साजरा केला.

 सदरच्या  स्नेह मेळावा घेण्याची संकल्पना  श्रीकांत रावसाहेब पाटील  व नामदेव रामलिंग कुंभार यांनी मागील सहा महिन्यापूर्वी मांडली  व त्यानंतर सर्व वर्ग मित्रांचे मोबाईल क्रमांक घेऊन व्हाट्सप ग्रुप तयार केला. त्यानंतर सर्व वर्ग मित्रांना जोडून व सर्वाच्या मताने माजी विद्यार्थी व शिक्षक मेळावा घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे सिद्धाई फंक्शन हॉल धाराशिव येथे कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. 

यामध्ये ५५ विद्याथी,विद्यार्थिनी व  ११ शिक्षक सहभागी झाले होते.तब्बल ३८ वर्षानंतर एकत्र येत सर्वाच्या अडी- अडचणी जाणून घेतल्या व अडचणीतील वर्ग मित्रांना सर्वानी मिळून मदत करण्याचे ठरले. जवळपास ४ दशकानंतर सर्वजण एकत्र आले. पुन्हा शाळा भरल्याचा आनंद घेतला.यावेळी शिक्षकांनी पण त्यावेळेची जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षण पद्धती विद्यार्थ्याविषयी असणारी तळमलीची भावना व्यक्त केली त्यांच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी शासकीय व निमशासकीय कार्यलयात आज वर्ग एक व दोन आणि इतर वरिष्ठ ठिकाणी काम करत असल्याचे कळल्यानंतर त्यांना खूप अभिमान वाटला. त्यावेळेची  शिक्षण पद्धती  व आताची शिक्षण पद्धत या मधील विसंगती आणि  गुरुजनाप्रती असणारा आदर याबाबत सर्व शिक्षकांनी मत मांडले .त्यास  विद्यार्थांनी प्रतिसाद दिला व पण पुन्हा शाळा भरल्याचा मनमुराद आनंद घेतला.

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  श्रीकांत पाटील,  नामदेव कुंभार,  मोहन पाटी, शिरीष गिरवलकर,  सुशीलकुमार माने , धनंजय शिवलकर,  मधुकर रसाळ, नासेर पठाण इत्यादीनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मोहन पाटील  तर आभार श्रीकांत पाटील यांनी मानले.

 
Top