धाराशिव  प्रतिनिधी-

लाखो रुपयांच्या घरफोड्या करणारा आरोपी आरोपी अक्षय बाळू शिंदे हा पुन्हा एलसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्या ताब्यातून 03 दुचाकी मोटारसायकल व 01 मोबाईल असा एकूण 1,46,000/-रु चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

चिखली (ता. जि. धाराशिव) येथील संभाजी शिवाजी सुरवसे हे 01 जुन, 2022 रोजी रात्री घरात झोपलेले असताना अनोळखी व्यक्तीने त्यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीस असलेली खिडकी उघडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सुवर्ण दागिने व 1,80,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 2,55,000 ₹ किं.चा माल घरफोडी करुन चोरुन नेला होता. यावरुन संभाजी शिवाजी सुरवसे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत बेंबळी पो.ठा. येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर अक्षय बाळु शिंदे (रा. सुंभा, ता.जि.धाराशिव) यास 28 जून, 2022 रोजी कोंड (ता.जि.धाराशिव) येथून ताब्यात घेतले होते. वरील नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी कसून व कौशल्यपुर्ण तपास केला असता यात त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील 10 ग्रॅम सुवर्ण दागिने तसेच होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकलीही जप्त केली होती. 

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलिस उपनिरीक्षक संदिप ओहेाळ यांना गुप्त बातमी दारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली कि, कोंड येथील रहिवाशी अक्षय बाळू शिंदे याच्या कडे चोरीच्या मोटारसायकल असून त्याने त्याचे राहते घरामध्ये ठेवल्या आहेत. त्यावरुन स्थागुशा च्या पोलिस पथकाने सदर ठिकाणी जाऊन अक्षय बाळु शिंदे याचा शोध घेतला असता तो कोंड शिवारातील शेतामध्ये मिळून आला. त्याच्या राहत्या घरी जाऊन खात्री केली असता त्याच्या घरात एकुण 03 मोटारसायकल व 01 मोबाईल मिळून आला. सदर मोटारसायकली व मोबाईल बाबत माहिती घेतली असता मोबाईल चोरीबाबत धाराशिव शहर पोलिस ठाणे येथे तर इतर 03 मोटारसायकल विषयी माहिती घेतली असता त्या चोरी झाले बाबत शिराढोण पोलिस ठाणे, सोलापुर जिल्ह्यातील सोलापूर तालुका व पांगरी पोलिस ठाणे या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर आरोपी अक्षय बाळू शिंदे (वय 23 वर्षे, रा.सुंभा हल्ली रा.कोंड, ता.जि. धाराशिव) यास 03 दुचाकी मोटारसायकल व 01 मोबाईल असा एकुण 1,46,000/-रु चा मुददेमालासह ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कारवाई करीता धाराशिव शहर पोलिस ठाणे येथे वर्ग केले आहे.

 सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि - यशंवत जाधव, सपोनि - शैलेश पवार, पोउपनि - संदिप ओहोळ, विनोद जानराव, समाधान वाघमारे, फरहान पठाण, मेहबुब अरब, नितीन जाधवर, अजित कवडे, बबन जाधवर यांच्या पथकाने केली आहे.

 
Top