धाराशिव / प्रतिनिधी-

वाघोली विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली प्रदिप शिंदे, ओमप्रकाश मगर, सतीष खडके, तानाजी पाटील, बाळासाहेब पवार, उत्तरेश्वर गोगावे, जयपाल मुंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी व महाविकास आघाडी पॅनलचा पराभव करत डॉ.पद्मसिंह पाटील पुरस्कृत ग्रामविकास पॅनलने दनदणीत विजय मिळवला.

 डॉ.पद्मसिंह पाटील पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचे सर्व १३ उमेदवार मोठया मताधिक्याने निवडुण आले आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी व महाविकास आघाडी पॅनल मध्ये लढत झाली होती. डॉ.पद्मसिंह पाटील पुरस्कृत ग्रामविकास पॅनल विजय उमेदवारात सर्व साधारण गटातुन गोरे शिवाजी महादेव, मगर बालाजी संदीपान, मगर काकासाहेब मारुती, मते शिवाजी किसन, मोदानी हनुमानदास लक्ष्मीनारायण, पाटील उत्तम सिताराम, पाटील रामकृष्ण विष्णु, शेळके श्रीकृष्ण विष्णु, तसेच महिला प्रतिनिधीतुन पवार जयश्री सुनिल, शिंदे लता तानाजी, अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातुन कसबे रावसाहेब मोहन, विमुक्त जाती / जमाती/ वि.मा.प्र.वर्गातुन मुंडे महारूद्र दामोदर, व इतर मागासगर्वातून शेख जावेद हस्मोद्दीन उमेदवार विजयी झाले.

 सोसायटीच्या निवडणुकीतील विजयानंतर डॉ.पद्मसिंह पाटील पुरस्कृत ग्रामविकास पॅनलने जल्लोश केला.

 
Top