तेर/प्रतिनिधी 

आई वडील यांना सार्थ अभिमान वाटेल असे कार्य करा असे आवाहन राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी केले .                                                         

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे सोशल अँड युजेकेशन डेव्हलपमेंट वेलफर असोसिएशन सामाजिक संस्था आणि फकीरा दल यांच्या वतीने सावित्रीमाईच्या लेकींचा सन्मान सोहळा आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  औरंगाबाद परीक्षेत्रच्या  नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलिस उपअधीक्षक सरोजिनी कदम , शोभा इंगळे रा.तेर या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवानी न्यायाधिश अनुश्री फंड, तेरच्या सरपंच दिदी काळे,तेर येथील ग्रामिण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. नागनंदा मगरे,पचांयत समितीच्या माजी सदस्या सुरैखा कदम , जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुख्यध्यापीका सुरैखा कदम, अँड पुजा देडे ,मीना सोमाजी , सुनिता बडवे ,रंजना हासुरे या उपस्थित होत्या.

उपस्थित मान्यववर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महीला आणि मुलींचा सावित्रीमाईची लेक म्हणुन सन्मान करण्यात आला.या मध्ये  पोलिस नाईक सारिका जटाळे, ,आश्विनी पाऊनशेटे ,डाँ रूमीना मोमीन,अँड अर्चना कांबळे, शरीफा सय्यद ,सिमा कदम, रोहिणी  कांबळे , सखुबाई राऊत , बाबई चव्हाण,  क्रांती येडके  तसेच खेळाडु सृष्टी बगाडे ,पुजा पिंपळे, आयैशा शेख, प्रिया जाधव,वैष्णवी माने, समिक्षा पवार,समृध्दी माने पल्लवी माने, श्रावणी शेळके, श्रावणी टेळे,दुर्गा गडदै,प्रज्ञा नागरगोजे, प्रनीता जाधव, नंदिनी पाडुळे ,समृद्धी आंधळे, वैभवी शेळके यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्तविक संस्था सचिव जोशीला लोमटे यांनी केले .यावेळी अनुश्री फंड,शोभा इंगळे, पुजा देडे, रंजना हासुरे यांनी आपले विचार व्यक्त केले.संस्थेचे अध्यक्ष बिभीषण लोमटे यांनी सुत्रसंचालन केले तर अभार सतीश कसबे यांनी मानले.यावेळी इयत्ता 7वी ते 12वी च्या महाराष्ट्र संत विद्यालय, तेरणा हायस्कुल , जिल्हा परिषद कन्या शाळा आणि जिल्हा परिषद पेठ शाळेतील  300 मुलींना आ. राणाजगजितसिंह पाटील  यांच्या वतीने शालेय साहित्य रजिस्टर आणि पेन वाटप करण्यात आले.


 
Top