कळंब / प्रतिनिधी-

येथील शिवसेवा तालीम संघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भव्य शिवजयंती उत्सव निमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

   शनिवार दिनांक 11 पासून ही व्याख्यानमाला सुरुवात होणारा असून पहिल्या दिवशी शाहीर संतोष साळुंखे लातूर यांचा पोवाडा, चा कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक 12 रोजी डॉ. शिवरत्न शेट्टे सोलापूर ,सोमवार दिनांक 13 रोजी प्रा. विशाल गरड बार्शी, मंगळवार दिनांक 14 रोजी सुभानअली शेख वसमत ,बुधवार दिनांक 15 रोजी प्रशांत देशमुख रायगड, गुरुवार दिनांक 16 रोजी गणेश शिंदे पुणे, शुक्रवार दिनांक 17 रोजी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा ताई अंधारे, तर शनिवार दि. 18 रोजी संस्कृती महाराष्ट्राची मुंबई हे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.हे कार्यक्रम संध्याकाळी सात ते नऊ च्या दरमयान होणार आहेत.

 या सर्व कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन, शिवजयंती चे मुख्य संयोजक शिवाजी आप्पा कापसे यांनी केले आहे.


 
Top