कळंब / प्रतिनिधी-

 येथील मांजरा नदी तीरावर पुरातन महादेव मंदिर(१८५९ )बांधलेले असून हे कळंब येथील भक्तांचे ग्रामदैवत आहे चैत्र शुद्ध एकादशी या दिवशी  भक्तांची मोठी गर्दी असते  मांजरा धरणाचे बॅक वॉटर साठा मंदिरासमोर मांजरा नदीत धनेगाव धरणाचे बॅक वॉटर पाणीसाठा आहे मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यातून मांजरा नदीकडे जाणारा एक छोटा ओढा आहे परतीच्या  पावसाने  (अतिवृष्टीमुळे) नदीला पूर आल्याने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील छोटा नळी असलेला या ओढ्यावरील वरील पूल वाहून गेला आहे बाजूचा सगळा रस्ता खचला आहे ओढ्यातील पाण्यामुळे भावीक भक्तांना मंदिराकडे दर्शनासाठी जाता येत नाही रस्ता बंद आहे .

चैत्र एकादशी दिवशी महादेवाच्या दर्शनाची ओढ भावीक भक्तांना असते पूर्वी या ठिकाणी पाच दिवस यात्रा भरत असे परंतु मांजरा नदीवरील बांधण्यात आलेल्या धनेगाव धरणामुळे नदी पात्रात पाणी साठा असतो या मुळे ही यात्रा बंद झाली आहे  परंतु दर्शनाची परंपरा असल्याने भावीक  भक्तांना दर्शनाची ओढ असते व गर्दीने दर्शन घेण्यात येते परंतु एकादशीचे दर्शन भक्तांना  घेता यावे यासाठी कळंब नगर परिषदेने या ठिकाणी रस्ता बनवावा व पूल बांधावा अशी मागणी भावी भक्तांनी निवेदनाद्वारे कळंब नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी शैला डाके यांच्याकडे केली आहे या मागणीचे निवेदन कार्यालयीन अधिकारी दीपक हरकर यांनी स्वीकारले या मागणी निवेदनावर ह. भ. प. महादेव महाराज अडसूळ ,नगरसेवक सतीश टोंणगे ,एॕड मनोज चोंदे ,सुरेश चव्हाण ,प्रा, दिलीप पाटील ,लिंबाजी चोंदे, शिवाजी शेंडगे, बजरंग कोळपे, हनुमंत कदम, बंडू ताटे ,प्रकाश कदम ,तानाजी कदम,विलास मिटकरी, रामचंद्र चोरघडे, भारत सांगळे ,पांडुरंग हजारे अच्युतराव माने, माधवसिंग राजपूत, अरुण चव्हाण , प्रशांत पडवळ, नाना शिंगणापुरे यांच्या सह्या आहेत.


 
Top