उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोणी आजारी असले आणि दादांना समजले की दादा थेट हॉस्पीटलमध्ये जावून रुग्णांसह नातेवाईकांची आपुलकीने विचारपूस करतात. आजपर्यंत एवढा संवेदनशील आमदार जनतेने बहुतेक पाहिला नसावा. सारोळा आणि काजळा येथील रूग्ण हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत,अशी माहिती कैलास दादांना देताच तातडीने सर्व कामे सोडून दादा रूग्णालयात दाखल झाले. तसेच डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णांची विशेष काळजी घ्या, काही अडचण आली तर मला कळवा असे सांगितले.

 तसेच नातेवाईकांना ही धीर देत काही अडचण आली तर मला कॉल करा असे सांगितले. गोर-गरिबांसाठी कायम धावून जातात. त्यामुळेच दादा म्हणजे आपल्याच घरातील सदस्य आहेत असे प्रत्येकाला वाटायला लागले आहे


 
Top