तेर / प्रतिनिधी-

  उस्मानाबाद तालुक्यातील   तेर  येथे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने ऊस खोडवा व बेणे मळा कार्यशाळा तसेच माती परिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील शास्त्रज्ञ उदय मंजुळ यांनी  मार्गदर्शन केले.

कारखान्याचे चेअरमन  अरविंद  गोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास संचालक चित्राव गोरे , शिवाजीराव नाईकवाडी, अविनाश पाटील, राजेश हाऊळ, सचिन डोंगरे,भानुदास लोमटे,आगतरा लोमटे,प्रकाश देशमुख,डाॅ.श्रीकांत गोरे,हरिभाऊ माने,शेतकी अधिकारी  शाम शिनगारे,ऊसविकास अधिकारी गुळवे व कर्मचारी तसेच तेर व ढोकी परीसरातील ऊस उत्पादक शेतकऱी उपस्थित होते.

 
Top