उस्मानाबाद / प्रतिनिधी -

रेल्वेसाठीची अर्थसंकल्पीय तरतूद सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद रेल्वे मार्ग दोन वर्षात पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाला बळकटी देणारी आहे असे मत - आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले.

सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आलेली रुपये ११० कोटीची तरतूद हा रेल्वे मार्ग २०२५ साला पर्यंत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे

ठाकरे सरकारने मागील अडीच वर्षात या रेल्वे प्रकल्पाबाबत काहीच निर्णय न घेतल्यामुळे हा प्रकल्प २०१९ पासून रेंगाळला होता. राज्यात सत्तांतर होताच मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदें साहेब व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी या रेल्वे मार्गासाठी ४५२.५६ कोटी रुपये राज्याचा हिस्सा मंजूर केला. केंद्र सरकारने पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी रुपये दहा१० लाख कोटींची तरतूद केली आहे. यामुळे अर्थकारणाला मोठी चालना मिळणार आहे. सन २०१९ मध्येच तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या प्रकल्पासाठी राज्य सरकारचा ५०% हिस्सा देण्याची तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री पियुजी गोयल यांना सहमती कळविली होती. परंतु ठाकरे सरकार आल्यानंतर अनेक वेळा या बाबीकडे लक्ष वेधून देखील डोळे झाक केली. तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी तर या प्रकल्पासाठी निधी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे वक्तव्य विधानसभेमध्ये केले. 

देशाच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी दळणवळण अतिशय महत्त्वाचे असून या अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यातील पण ७५ हजार कोटी रुपये केवळ नवीन प्रकल्पासाठी ठेवण्यात आले आहेत. रेल्वेसाठी हा अतिशय भरीव निधी असून सन २०१३-१४ मध्ये असलेल्या तरतुदीच्या ९ पट अधिकचा आहे. या प्रकल्पाचा समावेश महारेल मध्ये करून प्रकल्प फास्ट ट्रॅक वर आणत दोन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टाला अर्थसंकल्पातील या भरीव तरतुदीने अधिकच बळ दिले असून रेल्वेमंत्री ना. अश्विनीजी वैष्णव यांनी हा निधी खर्च झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे आणखीन निधी उपलब्ध करून दिला जाईल व या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नाही असा विश्वास दिला आहे.

 
Top