उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 माजी सैनिक यांच्या विविध मागण्या सोडवण्याची तारांकित प्रश्नाव्दारे लोकसभेत ओमप्रकाश राजेनिंबाकर यांनी  मागणी केली.

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये संरक्षण मंत्री राजनाथसिह  यांना विचारलेल्या लेखी तारांकित प्रश्नाव्दारे  उस्मानाबाद जिल्हयाकरीता सीएसडी कॅन्टीन विद्यार्थ्यांकरीता निवासी सुविधा, ईसीएचएस, भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र व माजी सैनिकांकरीता वृध्दाश्रम तसेच केंद्रीय सैनिक बोर्ड मार्फत राबवले जाणारे विविध योजनाबाबत लेखी मागणी केली होती. धाराशिव जिल्हयात माजी सैनिकांची संख्या मोठया प्रमाणात असुन हया सैनिकानी आपल्या सेवा कालामध्ये देशाच्या विविध भागामध्ये भारत मातेचे रक्षण करण्याकरीता आपल्या निवृत्ती पर्यंतचा काळ काश्मीर ते कन्याकुमारी तसेच आसाम पासुन राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये कर्तव्य बजावुन निवृत्त होतात.  तद्नंतर आपल्या जिल्हयामध्ये स्थायीक होत असताना संरक्षण मंत्रालयाकडुन आजी माजी सैनिकांकरीता विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात.    जिल्हयातील माजी सैनिकांना सीएसडी कॅन्टीनचा लाभ घेणेकरीता सोलापुर, पुणे, अहमदनगर आदि ठिकाणी जावे लागते. सीएसडी कॅन्टीन धाराशिव येथे सुरु करणेबाबत  तसेच वैद्यकिय सोई सुविधा घेणेकरीता पुणे येथील कॅन्टॉमेंट बोर्डाच्या हॉस्पीटलमध्ये जावे लागते.  या सर्व समस्यां बाबत जिल्हयातील निवृत्त सैनिकांच्या संदर्भात असुन या सर्व समस्यांवर लेखी तारांकित प्रश्न दाखल केला होता.

धाराशिव शहरामधील स.नं. ०८ मधील १ हे. ६२ आर जमीन मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे  २४/४/२००७ रोजी सादर करण्यात आला आहे सदरचा प्रस्ताव राज्य शासनाकडे २२/०५/२००७ रोजी सादर करण्यात आला आहे.  तरी सदरचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवणे आवश्यक असुन सदरील प्रस्ताव केंद्र सरकारने तात्काळ मागवुन घ्यावा व  सदरची जागा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या नावे वर्ग करावी. या या जागेत सीएसडी कॅन्टीन ईसीएचएस हॉस्पीटल मुलीचे वसतीगृह व  भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र याठिकाणी चालु करणे सोईचे होईल.

माजी सैनिकांचे पाल्य यांच्याकरीता भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र सुरु करणेबाबत तसेच   माजी सैनिक यांचेसाठी  वृध्दाश्रम, ईसीएच हॉस्पीटल, व सैनिक कल्याण बोर्ड तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनेच्या संदर्भामध्ये लेखी तारांकिंत प्रश्न विचारण्यात आला.  

 सदरील प्रश्न हा प्रश्नोत्तराच्या यादीमध्ये क्र. ०३ वर होता मात्र हिंडनबर्ग रिपोर्टमुळे प्रश्नोत्तराचा तास न झाल्याने सभागृह पुर्ण दिवसाकरीता तहकुब करण्यात आले त्यामुळे या प्रश्नावर  सविस्तर चर्चा झाली नाही त्यामुळे संरक्षण मंत्री   राजनाथसिंह यांनी लेखी उत्तर देऊन कळविले आहे.


 
Top