उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सध्याचे युग इंटरनेटचे असून जवळपास घरोघरी स्मार्टफोनचा वापर होत असुन लोकांच्या अज्ञानीपणाचा गैरफायदा घेउन ऑनलाईन लुटमार करणाऱ्या गुन्हेगारांचे यातून चांगलेच फावले आहे. बँक ग्राहकांना फोनकरून बँक खात्याची माहिती अद्ययावत करण्याच्या बहाण्याने ओटीपी मागणे, लिंक पाठवून त्यात ग्राहकास बँक खातेविषयक गोपनीय माहिती भरावयास लावने, त्वरीत कर्ज, सेक्सटॉर्शन, ऑनलाईन समाज माध्यमांत बदनामी करणे यांसारखे अनेक गुन्हे घडत असून हजारो लोकांचे कोट्यावधी रुपये सायबर गुन्हेगारांनी लंपास केले आहेत.

 सध्या उस्मानाबाद शहरातील श्री तुळजाभवानी क्रिडा संकुलात कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.  पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने या प्रदर्शनात एक जनजागृती कक्ष उभारण्यात आला असुन सायबर गुन्हेगारी विरोधी जनजागृती केली जात आहे. सायबर पो.ठा. चे पो.नि.-  पटेल, सपोनि-  सुदर्शन कासार यांसह पोलीस अंमलदार उपस्थितांना सायबर गुन्हयाविषयी माहिती देत आहेत. 


 
Top