उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील श्रीतुळजाभवानी क्रीडा संकुलात जिल्हा कृषी कार्यालय आयोजित कृषी महोत्सव २०२३ यामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे कलाविष्कार अकादमी उस्मानाबाद प्रस्तुत हौशी छंदी गायक मेलडी स्टार समूहाचा साल नया गीत पुराने अवीट गीत गझलांची बेधुंद मैफील दि.१०.२. २३ रोजी झाली . 

प्रथम कृषी कार्यालयाचे अधिकारी जितेंद्र शिंदे , आनंद समुद्रे , मेलडी स्टार चे प्रवर्तक युवराज नळे समन्वयक शेषनाथ वाघ, रवींद्र कुलकर्णी निवेदक प्रभाकर चोराखळीकर मान्यवर सर्व गायक यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले . भारत रत्न लता मंगेशकर यांना प्रथम पुण्यस्मरणार्थ प्रगती शेरखाने हिने प्रथम लता मंगेशकर यांच्या गीताच्या गायनाने सुरुवात करून अनुक्रमे २७ गीतांचे गायन शरद वडगावकर, रवींद्र कुलकर्णी, शेषनाथ वाघ, युवराज नळे, प्रगती शेरखाने, क्षितीजा निंबाळकर, अभिजीत शेळके, मुकुंद पाटील मेंढेकर,सौ. राजश्री निंबाळकर,तौफीक शेख , नितीन भन्साळी, राजाभाऊ कारंडे, नितीन बनसोडे, शकील       सिद्धीकी, विधिज्ञ गजानन चौगुले कृषी कार्यालय अधिकारी जितेंद्र शिंदे, श्री डोणे यांनी बहारदार गीतांचे बहारदार गायनाचा रसिकांबरोबर कृषी महोत्सव पाहण्यास आलेले प्रेक्षकांनीही मैफलीचा लाभ घेतला शेषनाथ वाघ यांच्या लख्ख पडला प्रकाश गोंधळगीत गायनाने कृषी महोत्सव सभागृह दणानून गेले विधिज्ञ गजानन चौगुले यांच्या मंत्रमुग्ध प्रसायदानाने सांगता करण्यात आली समुहसदस्य धनंजय कुलकर्णी, सुशील कुलकर्णी उपस्थितहोते .सुत्रसंचालन प्रभाकर चोराखळीकर यांनी केले तर आभार मेलडी स्टार प्रवर्तक युवराज नळे यांनी मानले.


 
Top