उस्मानाबाद / प्रतिनिधी-   

 उस्मानाबाद तालुक्यातील म्होतरवाडी-पानवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश शंकर पाडुळे व्हाइस  चेअरमनपदी सचिन रूपचंद डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

   यावेळी निवडणूक अधिकारी ए.एस.कस्तुरे, सहाय्यक ए. टी. सोलंकर व गटविकास सचिव डी. बी. कांबळे, म्हणून यांनी काम पाहिले चेअरमन, व्हाइस चेअरमन व कार्यकारी संचालकांचे अभिनंदन करण्यात आले. 

यावेळी सरपंच ज्ञानेश्वरी राम पांचाळ , उपसरपंच महेश अंगद चव्हाण , पोलिस पाटील सुभाष कदम, युवा नेते पांडुरंग आंधळे ,राजाभाऊ पाडुळे , परमेश्वर वसंतराव चव्हाण, काकासाहेब चव्हाण , राजाभाऊ चव्हाण, विराट पाटील, मधुकर पाडुळे, उत्तरेश्वर चव्हाण, आगतराव डोंगरे,  तानाजी कदम आदीसह सोसायटी चे संचालक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदीसह उपस्थित होते.

 

 
Top