उस्मानाबाद / प्रतिनिधी-   

सामान्य लोकांना मंत्रालयापर्यंत जायची गरज भासू नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, क्षेत्रीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्याचे २० िडसेंबर २०२२ पासून ठरविण्यात आले आहे. मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन झाल्यामुळे अर्ज निकाली निघून लवकर न्याय मिळेल, अशी जनतेची अपेक्षा होती. उस्मानाबाद येथील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडे २५ अर्ज आले होते. त्यापैकी केवळ १ अर्ज निकाली निघाला आहे. 

या कक्षाचे पदसिध्द विशेष कार्यकारी अिधकारी म्हणुन निवासी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर या कक्षामध्ये सर्वसामान्य जनतेचे अर्ज, निवेदने, स्विकारण्यासाठी नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांना मुख्यमंत्र्यांना भेटून अर्ज व निवेदन द्यायचेत त्यांनी मुंबईला जायची गरज नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयातच या कक्षात जाऊन अर्ज देणे अपेक्षीत आहे. अर्ज स्विकारताना स्थानिक स्तरावरील अर्ज व निवेदने आिण शासनस्तरावरील अर्ज व निवेदने असे दोन भाग करण्यात आले आहे. आलेला अर्ज ४५ दिवसाच्या आत निकाली काढने अपेक्षीत आहे. 

२ महिन्यात २५ अर्ज 

अप्पर जिल्हाधिकारी शिवाजीराव शिंदे यांनी दोन महिन्यात उस्मानाबाद येथील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात एकुण २५ अर्ज आले असून १३ अर्ज हे शासनस्तरावरील आहेत. तर १२ अर्ज हे स्थानिक स्तरावरील आहेत. स्थानिक वरील १२ अर्ज ज्या-त्या विभाग प्रमुखाकडे पाठविण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा परिषद, समाजकल्याण, महसूल, मृद संधारण आदी विभाग संदर्भात हे अर्ज होते. यापैकी ४ अर्जाचे अहवाल संबंधित विभागाने कक्षाकडे पाठविले आहे. तर एक अर्ज निकाली काढला आहे, अशी माहिती ही शिंदे यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी उपस्थित होते. 

 
Top