उस्मानाबाद / प्रतिनिधी-                        

उस्मानाबाद तालुक्यातील पळसवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक 27 रोजी आयोजित करण्यात आले होते .या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पळसवाडी गावचे सरपंच   हरिभाऊ सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी चिमुकल्यांनी विविध गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ आरती नानासाहेब कोळगे, पळसवाडी गावचे पोलीस पाटील सौ सोनिया धनंजय शिंदे, उपसरपंच श्री अविनाश मुळे ,ग्रामपंचायत सदस्य श्री लिंबा जाधव ग्रामपंचायत सदस्या सौ कुसुम दगडू दंड नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील चिमुकल्यांनी एकापेक्षा एक अशा हिंदी, मराठी ,देशभक्ती ,पोवाडे शेतकरी गीत ,ऐतिहासिक नाटिका सादर करून उपस्थित सर्व मान्यवर पालकांची मने जिंकली. गावातील सर्व ग्रामस्थांनी बालकलाकारांचे कौतुक करून बक्षिसे दिले .यातून रुपये 24808 रोख बक्षीस मिळाले. वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री क्षिरसागर सर ,श्री हजारे सर व श्रीमती उलगडे मॅडम यांचे मोलाचे प्रयत्न केले.


 
Top