तेर/ प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील सर्व प्रकारची परवानाधारक दारूची दुकाने  गावाच्या बाहेर काढण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष सचिन देवकते यानी तेर ग्रामपंचायतकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तेर गावातील सर्व प्रकारची परवानधारक दारूची दुकाने ही गावातील मुख्य रस्त्यावर जो रस्ता आठवडी बाजार आणि जिल्हा परिषद ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेकडे जातो. त्याच रस्त्यावरती आहेत. त्यामुळे गावातील शाळकरी मुलींना व आठवडी बाजारात येजा करणाऱ्या महिलांना याचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास होत आहे. त्यामुळे ही सर्व दुकाने गाव हद्दीबाहेर काढावीत तसेच गावातील अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यामुळे अनेक तरुण पिढी बरबाद झाली आहे तसेच अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. याची दखल न घेतल्यास तेर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पार्टीचे उस्मानाबाद तालुका अध्यक्ष सचिन देवकते यांनी तेर ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे दिला आहे.


 
Top