तेर /प्रतिनिधी

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे महीलांच्या परीश्रमामुळे स्वच्छता अभियान राबवुन   ग्रामीण रूग्णालय व जिल्हा परिषद कन्या शाळा तसेच जिल्हा परिषद केंद्रीय शाळा येथे परसबाग तयार करण्यात आली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे गुंज या सेवाभावी संस्थेच्या वतीने  ग्रामीण रूग्णालय परीसरात व जिल्हा परिषद कन्या शाळा तसेच जिल्हा परिषद केंद्रीय शाळा परीसरात तेर येथील महीलानी परीश्रम करून स्वच्छता अभियान राबवुन स्वच्छता करण्यात आली तसेच परसबाग तयार करुन पाले भाज्या यांच्या बियाचे डोबन करून पाले भाज्या यांची रोपटे लावण्यात आली. गुंज संस्थेचे उस्मानाबाद जिल्हा समन्वयक प्रदिप वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान व परसबाग उपक्रम राबविण्यात आला.


 
Top